शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मणिपूरमध्ये जमावाने जवानाचे घर जाळले; शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न, दोन ठिकाणी गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 8:48 AM

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

इंफाळ : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात संतप्त जमावाने भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) जवानाचे घर जाळले, तसेच शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. २ ठिकाणी गोळीबार करण्यात आला. जवानाचे घर जाळण्यापूर्वी मंगळवारी रात्री समाराम येथे ७००-८०० लोकांच्या जमावाने चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगबल येथील भारतीय राखीव दलाच्या कॅम्पमधून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ वर्षीय रोनाल्डो या व्यक्तीचा मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या एका दलावरही जमावाने हल्ला केला. त्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांवर गोळीबार केला आणि त्यांचे वाहन पेटवून दिले, त्यात एका जवानाच्या पायात गोळी लागली. या चकमकीत इतर १० जण जखमी झाले.

माकपा, भाकपाचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणारमाकपा, भाकपा यांचे संयुक्त शिष्टमंडळ ६ ते ८ जुलै दरम्यान हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही पक्षांनी मणिपूरला भेट देण्यासाठी पाच सदस्यीय पथकाची घोषणा केली. यामध्ये माकपचे राज्यसभा सदस्य विकास रंजन भट्टाचार्य, जॉन ब्रिटास आणि भाकपाचे खा. विनय विश्वम, संतोष कुमार पी. आणि के. सुब्बा रायन यांचा समावेश आहे.

हिंसेची जेपीसी चौकशी करा : काँग्रेस केरळ काँग्रेस (एम) प्रमुख आणि राज्यसभा सदस्य जोस के. मणी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनात या विषयावर चर्चा व्हावी, असे ते म्हणाले. मणिपूरमध्ये जे काही घडले ते केवळ लोकांमधील दंगल नाही तर देशाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या ‘नियोजित नरसंहार’प्रमाणेच आहे, असा दावा त्यांनी केला.

फुटबॉलपटूमुळे वाद राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मणिपूरचा खेळाडू जॅक्सन सिंगने कुवेतविरुद्धच्या सैफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर वैयक्तिक पदक घेताना मैतेई ध्वज ओढून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.फिफा २०१७ अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय डिफेन्सिव्ह मिडफिल्डर जॅक्सनने म्हटले की कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान