Indian Army: लाडकी लेक सैन्य दलात 'मेजर' बनली, माजी मुख्यमंत्र्यांना अत्यानंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:45 PM2022-03-09T14:45:45+5:302022-03-09T14:47:13+5:30
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन लाडक्या लेकीसह आपला फोटो शेअर केला आहे.
मुंबई - माणूस कितीही मोठा असला तरी, आपली मुलं हे आपल्यापेक्षा कर्तृत्ववान व्हावीत हीच त्याची इच्छा असते. आपल्या मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करावेत, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात स्वत:चं नाव करावं, हे स्वप्न आई-वडिलांचही असतं. मग, ते वडिल राज्याचे माजी मुख्यमंत्री किंवा देशाचे माजी केंद्रीय मंत्री का असेनात. देशाचे माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर अकाऊंटवरन आपल्या लेकीचा फोटो शेअर करत अत्यानंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच, आजचा दिवस माझ्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याचंही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन लाडक्या लेकीसह आपला फोटो शेअर केला आहे. कारण, मुलगी श्रेयशी निशंक हिची भारतीय सैन्य दलात मेजर पदावर पदोन्नती झाल्याने आपणास अत्यानंत झाल्याचे त्यांनी म्हटलं. देवभूमी उत्तराखंड ही वीर मातांची भूमी आहे. येथे साधारण प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती सैन्य दलात भरती असून देशसेवा बजावत आहे. देवभूमीच्या या गौरवशाली परंपरेला आपल्या मुलीने पुढे नेल्याचं निशंक यांनी म्हटलं. माझ्या मुलीसह उत्तराखंडमधील कन्या समाजहित आणि राष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय एक पाऊल पुढे असल्याचंही रमेश निशंक यांनी यावेळी म्हटलं.
मित्रों!
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) March 8, 2022
आज का दिन मेरे लिए अपार गौरव एवं गर्व से अभिभूत करने वाला दिवस है। आज #InternationalWomensDay होने के साथ ही बेटी श्रेयसी निशंक की भारतीय सेना में मेजर पद पर पदोन्नति हुई है। pic.twitter.com/wozJV51AH1
माजी केंद्रीयमंत्री आणि पिता या फोटोमध्ये आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेऊन तिचा अभिमान व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच, मेजर पदावर पदोन्नती झाल्यानंतर सैन्याच्या वर्दीवर मेजरचा सिम्बॉल लावताना दिसून येतात.