शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

रक्त सांडवण्यास आलेल्या दहशतवाद्याचे जवानांनी रक्त देऊन वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 6:13 AM

भारतीय लष्कराचे मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर

श्रीनगर :

जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला रक्त देऊन भारतीय जवानांनी त्याचे प्राण वाचवले. आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले आहे.  

जवानांनी त्याला दहशतवादी नाही, तर एक मानव समजून त्याचे प्राण वाचवले. त्याला अन्य रुग्णांप्रमाणेच वागवण्यात आले. तो ज्यांचे रक्त सांडण्यासाठी आला होता, त्यांनीच त्याला रक्त दिले, हा भारतीय लष्कराचा मोठेपणा आहे, असे राजौरी येथील लष्करी रुग्णालयाचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव नायर म्हणाले. 

२१ ऑगस्ट रोजी नौशेराच्या झांगर सेक्टरमध्ये भारतीय जवानांना तीन दहशतवादी दिसले. त्यांतील एकजण नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौकीजवळ येऊन संरक्षक तार तोडण्याचा प्रयत्न करीत होता. जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोळीबारानंतर एकाला जिवंत पकडण्यात आले; तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळी लागून हा दहशतवादी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे लेफ्टनंट कर्नल देवेंद्र यादव यांनी सांगितले.

हाताने जेवणही भरवले...हुसैनचा खूप रक्तस्राव झाला होता. तो जीवन-मरणाच्या सीमेवर होता. भारतीय जवानांनी रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. एवढेच नाहीतर त्याला आपल्या हाताने जेवण भरवलेे, असे ब्रिगेडियर राणा म्हणाले. मी मरण्यासाठी आलो होतो, मला धोका देण्यात आला. बंधू, मला येथून बाहेर काढा, असे हुसैन अटकेवेळी ओरडत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हल्ल्याचा पूर्ण प्लॅन ठरला होतात्याने अन्य दहशतवाद्यांसोबत मिळून भारताच्या सीमावर्ती चौक्यांची दोन ते तीनवेळा रेकी केली होती व ते योग्य वेळी हल्ला करण्यासाठी टपून होते. कर्नल चौधरी यांनी त्यांना २१ ऑगस्ट रोजी ठरवून दिलेल्या भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यास सांगितले होते, असे हुसैनने चौकशीत कबूल केल्याचे ब्रिगेडियर कपिल राणा यांनी सांगितले.

पाक कर्नलने दिले ३० हजार रुपयेचौकशीदरम्यान जखमी दहशतवाद्याने गुन्हा कबूल केला. त्याने त्याचे नाव तबारक हुसैन असल्याचे आणि तो पाकव्याप्त काश्मीरातील सब्जकोट गावचा रहिवासी असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यासाठी ३० हजार पाकिस्तानी रुपये दिले होते, असे तो म्हणाला. 

मला बाकीच्या दहशतवाद्यांनी धोका दिला. त्यामुळे मी पकडला गेलो. माझे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले असून, पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या अनेक शिबिरांत मी गेलेलो आहे. - हुसैन 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान