ऑनलाइन लोकमत
कन्नूर, दि. 26 - केरळमधील सीपीएमचे सचिव कोदीयेरी बालकृष्णन यांनी भारतीय लष्कराबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. बालक्रृष्णन यांनी लष्करावर अपहरण आणि बलात्काराचे गंभीर आरोप केला आहेत. लष्कराला जास्त अधिकार दिले तर, ते कोणाबरोबर काहीही करु शकतात.
लष्कर महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करेल. लष्कराला कन्नूर येथे तैनात केले तर, येथील जनतेबरोबर त्यांचा संघर्ष अटळ आहे. एका कार्यक्रमात भाषण करताना बालकृष्णन यांनी ही वादग्रस्त वक्तव्ये केली.
चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र पाहिले तर, लष्कर त्यांच्यावर सरळ गोळीबार करते. कोणलाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही अशी वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली आहेत. या विधानांबद्दल कोदीयेरी यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच युद्धासारख्या परिस्थितीत लष्करी अधिका-यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे विधान केले होते.
They can take any woman and rape her, nobody has the right to question themThis is the state wherever the army is: Kodiyeri Balakrishnan pic.twitter.com/FIojnZK6Bc— ANI (@ANI_news) May 26, 2017