जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्न सुरू असतो. या विरोधात लष्कर नेहमी कारवाई करत असते. गेल्या काही दिवसापूर्वी लष्काराने मोठी कारवाई केली होती. दरम्यान, लष्करही पीओके परत घेण्याच्या तयारीत आहे. खुद्द लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ही माहिती दिली आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लष्कर पीओके परत घेण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत, असंही त्यांनी म्हटले आहे.
सरकारकडून आदेश येताच लष्कर पीओके परत घेण्याची मोहीम सुरू करेल. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने हाणून पाडत असतानाच त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. मंगळवारीही सीमा सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून देशात घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले.
गेल्या काही दिवसापूर्वी घुसखोरी करत असताना एक पाकिस्तानी मारला गेला, तर दुसऱ्या घटनेत आणखी एका घुसखोराला अटक करण्यात आले आहे. जवानांनी सोमवारी पहाटे जम्मूच्या अरनिया सेक्टर आणि सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडले.
घुसखोरांनी जवानांचे ऐकले नाही, त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. आणखी एका घटनेत, रामगढ सेक्टरमधील कुंपणाजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आलेल्या पाकिस्तानी घुसखोराला सैन्याने अटक केली. गेट उघडल्यानंतर त्याला भारतीय बाजूच्या कुंपणाजवळ आणण्यात आले, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.