नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही अडचणीत सापडली आहे. अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद असल्यानं त्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलेली आहे. पण अशा संकटाच्या काळातही आपल्याला लष्करात नोकरीची संधी मिळत आहे. जर आपण अभियांत्रिकी (BE/BTech) केली असेल किंवा अंतिम वर्षात असाल तर आपल्याला भारतीय लष्करात(Indian Army) दाखल होण्याची संधी मिळणार आहे. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC 132) भारतीय सैन्याने रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे. लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरही माहिती देण्यात आली आहे. या रिक्त जागांवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बातमीमध्ये त्याची आवश्यक माहिती, नोटिसा आणि अधिकृत वेबसाइट दिलेल्या आहेत. कोणत्या प्रवाहासाठी किती जागा रिक्त?सिव्हिल - 8आर्किटेक्चर - 1यांत्रिकी - 4इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स - 5संगणक विज्ञान - 11इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण - 8इलेक्ट्रॉनिक्स - 1मेटलर्जिकल - 1इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन - 1मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोवेव्ह - 1एकूण रिक्त जागा - 41अर्ज माहितीयासाठी joinindianarmy.nic.in वर जॉइन करून ऑनलाईन अर्ज करावे लागतील.ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख - 28 जुलै 2020 (दुपारी 12 पासून)अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 ऑगस्ट 2020भारतीय सैन्य अकादमी (IMA Dehradun), डेहराडून येथे जानेवारी 2021पासून हा कोर्स सुरू होईल. या कोर्सनंतर उमेदवारांना भारतीय सैन्यात कायमस्वरुपी कमिशन देण्यात येईल.नोकरीसाठी काय आवश्यक?संबंधित प्रवाहात किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी. आपण अंतिम वर्षात असल्यास पदवी कोर्स सुरू झाल्याच्या 12 आठवड्यांच्या आत पदवी सादर करावी लागणार आहे. उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्यादरम्यान असावे. आपल्याला नियमानुसार सूट मिळण्याचा लाभ मिळेल. ही रिक्त जागा अविवाहित पुरुषांसाठी आहे.निवड कशी होईलविहित कट ऑफ अंतर्गत अर्ज करणार्यांना अभियांत्रिकी पदवी कोर्स (Bachelors) मध्ये सहाव्या सेमेस्टर/मास्टर/द्वितीय सत्रात आर्किटेक्चरमधील 8व्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. तर शॉर्टलिस्टेड उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू आणि कपूरथला येथील निवड केंद्रांवर मानसशास्त्रज्ञ, गटचाचणी अधिकारी आणि मुलाखत अधिकारी यांच्याद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना SSBने घेतलेल्या दोन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेमधून जावे लागेल. ज्या उमेदवारांना SSB वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाईल त्यांना सामील होण्यासाठी पत्र दिले जाईल.
लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 7:34 PM