नवी दिल्ली - अंदमान-निकोबार बेटांपासून ते लडाखपर्यंत सैन्याची सर्व सॅटेलाईट कम्युनिकेशन्स सिस्टम सतत पाच दिवस अॅक्टिव्ह राहिली. 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान, सैन्याने आपलं कम्युनिकेशन किती मजबूत आहे याची चाचपणी केली. शत्रूचा हल्ला झाल्यास त्याची हायटेक सॅटेलाइट कम्युनिकेशन यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी ऑपरेशन 'स्कायलाइट' करण्यात आले. 5 दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये सैन्याने वेगवेगळ्या परिस्थितींवर मॉक-ड्रिल केले. 'स्कायलाइट' ऑपरेशनमध्ये इस्रो आणि इतर एजन्सींनीही सहभाग घेतला. सैन्याने हा संपूर्ण सराव चीनला डोळ्यासमोर ठेवून केला आहे. ड्रॅगनने अंतराळ, सायबर स्पेसपासून इलेक्ट्रॉनिक युद्धापर्यंत सर्व गोष्टींसाठी प्राणघातक शस्त्रे विकसित केली आहेत. चीनला लागून असलेली देशाची उत्तरेकडील सीमा लष्करासाठी मोठी चिंतेची बाब आहे.
या ऑपरेशनची का होती गरज?
मल्टी-डोमेन ऑपरेटरसाठी जागा तयार करण्यासाठी सैन्य अनेक आघाड्यांवर काम करत आहे. दुर्गम भागात लाईन ऑफ साईटपासून दूर टेक्निकल कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट नेटवर्क्स आधीच कार्यरत आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, जगाने सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाबरोबरच कम्युनिकेशन्सचा वापर पाहिला. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने डिफेन्स सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इलॉन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सच्या मालकीच्या 'स्टारलिंक'ने विश्वसनीय सॅटेलाइट कम्युनिकेशन्सच्या प्रभावावर शिक्कामोर्तब केले आहे.
सैन्याला डेडिकेटेड सॅटेलाइट देण्याचे काम सुरू
सैन्य सध्या इस्रोच्या अनेक सॅटेलाइटचा वापर करतं. याद्वारे शेकडो स्टॅटिक कम्युनिकेशन टर्मिनल्स, ट्रान्सपोर्टेबल व्हिइकल-माउंट टर्मिनल्स, मॅन-पोर्टेबल आणि मॅन-पॅक टर्मिनल्स जोडलेले आहेत. 2015 च्या अखेरीस पहिला डेडिकेटेड सॅटलाईट GSAT-7B प्रक्षेपित केल्यावर सैन्याच्या कम्युनिकेशनला मोठी चालना मिळेल. संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये 4,635 कोटी रुपयांच्या या सॅटेलाइटला मंजुरी दिली होती. नौदल आणि हवाई दलाकडे GSAT-7 मालिकेचे सॅटेलाइट आधीपासूनच आहेत.
GSAT-7B चा कसा होईल फायदा?
नौदलाचा GSAT-7 सॅटेलाईट (रुक्मिणी) प्रामुख्याने हिंदी महासागर क्षेत्र कव्हर करतो. GSAT-7B चे लक्ष उत्तर सीमांवर असेल. प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह हा अशा प्रकारचा पहिला स्वदेशी मल्टीबँड सॅटेलाईट असेल. हे केवळ जमिनीवरील सैन्यालाच नव्हे तर दूर असलेल्या विमानांना आणि इतर मिशन क्रिटिकल आणि फायर-सपोर्ट प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक टेक्निकल कम्युनिकेशन प्रदान करेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.