नवी दिल्ली - देशप्रेमाचा जोश असलेला प्रत्येक तरुण देशासाठी लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहत असतो. देशाचं संरक्षण आणि सुरक्षेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी तो प्रत्येक परीक्षेमधून तावून सुलाखून बाहेर पडण्यास तयार असतो. मात्र लष्करात भरती होण्याचं सर्वांचंच स्वप्न सत्यात उतरतं असं नाही. अनेक तरुण लष्कराकडून भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरतात.
लष्करामध्ये भरती करण्यासाठी तरुणांच्या विविध चाचण्या घेतल्या जातात. भरती होणारा तरुण केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून चालत नाही. तर लष्करातील भरतीचे काही निकष हे वेगळे असतात की ज्यांची पूर्तता झाली नाही तर तरुणांना लष्करात प्रवेश मिळत नाही. असाच एक निकष आहे, तरुणांचे सपाट पाय असणे.
सपाट पाय असलेल्या तरुणांची लष्करामध्ये भरती होत नाही. सपाट पाय असलेल्या तरुणांना भरतीच्या पुढच्या प्रक्रियेत जाण्यापासून रोखले जाते. एवढंच नाही तर त्यांना ट्रेनिंग पूर्ण करण्याचीही परवानगी दिली जात नाही. आता तुम्ही विचार कराल की, असं का होतं. तर त्यामागे एक खास कारण आहे. हे असं कारण आहे ज्यामुळे लष्करात भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणांचं स्वप्न क्षाणार्धात तुटतं. मात्र दु:खद बाब म्हणजे या समस्येवर कुणाकडेच उपाय नसतो. ते कारण म्हणजे सपाट पाय असणं. त्याला फ्लॅट फूट असंही म्हणतात. कारण असा परिस्थितीत पायाचे तळवे हे पूर्णपणे सपाट असतात. त्यामुळे असे पाय असलेले लोक पायांवर अधिकाधिक भार देण्यास अक्षम असतात. तसेच त्यांना वेगाने धावताही येत नाही.
लष्करामध्ये सपाट पाय असलेल्या लोकांना अनफिट घोषित केले जाते. कारण ते अधिक वेळ उभे राहू शकत नाहीत. तसेच वेगाने धावूही शकत नाहीत. त्याशिवाय त्यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये वेदना होता. तर लष्कराला सैन्यात काम करण्यासाठी पूर्णपणे मजबूत आणि चपळ तरुणांची आवश्यकता असते.