नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर आता भारतीय लष्कारानेही कंबर कसली आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कर 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात करत आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी स्वतः याची घोषणा केली. देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी लष्कराने एकूण आठ क्वारंटाइन सेंटर्स सुरू केली आहेत.
ऑपरेशन नमस्तेची घोषणा करताना नरवणे म्हणाले, या महामारी विरोधातील लढाईत सरकारला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भूतकाळातही, अशा अनेक मोहिमा आपल्या लष्कराने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ऑपरेशन नमस्तेही यशस्वीपणे पार पाडले जाईल.
जवानांची सुरक्षितता ही माझी मुख्य जबाबदारी -
कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत सरकार आणि नागरिकांची मदत करणे आमची जबाबदारी आहे. मात्र एक लष्करप्रमुख म्हणून, आपल्या जवानांना सुरक्षित आणि फिट ठेवणे ही माझी मुख्य जबाबदारी आहे. आपण पूर्णपणे सुरक्षित असलो तरच आपली कर्तेवे यशस्वीपणे पार पाडू शकतो, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
लष्कर सोशल डिस्टंसिंगचे पालन करू शकत नाही -
नरवणे म्हणाले, दैनंदिन कर्यात भारतीय लष्कर सोशल डिस्टंसिंगचे पालन करूच शकत नाही. यामुळे, देशाच्या रक्षणासाठी आम्हाला स्वतःला सुरक्षित आणि फिट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाहता काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन केले जायला हवे. जवानांनाही त्यांनी विश्वास दिला, की आपण आपल्या जवळच्या नातलगांची चिंता करू नये कारण लष्कर त्यांची योग्य पद्धतीने देखभाल करत आहे.
जवानांना दहा महिने सुट्टीच घेतली नव्हती -
नरवणे म्हणाले, की अशा परिस्थितीत जवानांची सुट्टी रद्द केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. याचा त्यांच्यावर परिणामही होऊ शकतो. मात्र, 2001-02 साली ऑपरेशन पराक्रमदरम्यान लष्कराच्या जवानांनी जवळपास आठ ते दहा महिने सुट्टी घेतली नव्हती, याची आठवणी त्यांनी यावेळी करून दिली.
देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी, असेही मोदींनी म्हटले आहे.
देशात गुरूवारी एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू -
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. तर 700 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला