नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडने 550 स्वदेशी मशीन पिस्तुल ASMI ची खरेदी करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. याआधीही 550 बंदुका खरेदी करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्कराच्या या ऑर्डरमुळे संरक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. ही बंदूक कर्नल प्रसाद बनसोड यांनी डीआरडीओच्या सहकार्याने बनवली आहे. नंतर ती हैदराबादच्या लोकेश मशीन्स नावाच्या कंपनीने बनवली आहे. ही बंदूक पूर्णपणे स्वदेशी आहे.
जवळच्या लढाईत म्हणजेच क्लोज कॉम्बैटमध्ये लहान, प्राणघातक आणि हलकी शस्त्रे वापरली जातात. अशा परिस्थितीत ASMI खूप प्रभावी ठरेल. ASMI (अस्मि) हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ अभिमान, स्वाभिमान आणि मेहनत असा होतो. ही तयार करण्यासाठी 4 महिने लागले. त्याचे दोन प्रकार आहेत. 9 एमएम मशीन बंदुकीचे वजन फक्त 1.80 किलो आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे टेलिस्कोप, बायनोक्युलर किंवा बीम बसवता येते. या बंदुकीची लांबी 14 इंच आहे. जेव्हा बट उघडले जाते, तेव्हा ती 24 इंच होते.
ही बंदुक ॲल्युमिनियम आणि कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे. तसेच, बंदुकीची अचूक रेंज 100 मीटर आहे. मॅगझिनमध्ये स्टील लायनिंग असल्यामुळे बुलेट त्यात अडकणार नाहीत. अस्मी मशीन बंदुकीच्या मॅगझिनमध्ये पूर्ण लोड केल्यावर 33 गोळ्या असतात. ही बंदुक एका मिनिटात 600 गोळ्या झाडू शकते. बंदुकीचे लोडिंग स्विचेस दोन्ही बाजूला आहेत. म्हणजेच ही बंदुक दोन्ही हातांनी वापरणे सोपी असणार आहे.