पाकिस्तान नेहमी सीमेवर कुरापती करत असते. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याच्या घटना अनेक समोर आल्या आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता सीमेवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यासाठी लष्कराने क्वाडकॉप्टर जॅमर आणि मल्टी-शॉट गनसह दोन प्रणाली असणार आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानच्या कारवायांना प्रत्युत्तर मिळणार आहे.
"लष्कराने नियंत्रण रेषेवर क्वाडकॉप्टर जॅमर बसवले आहेत, यात मल्टी-शॉट गनही जोडली आहे. एक्वा जॅमरची क्षमता ४,९०० मीटर उंचीपर्यंत आहे. हे जॅमर शत्रूच्या ड्रोनला शोधून त्याची कनेक्टिव्हिटी तोडतात. ते खाली आणण्यासाठी मल्टी वेपन प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या मल्टी शॉट गनद्वारे कारवाई करतात.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार, संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो"; भाजपाच्या मंत्र्याचं अजब विधान
अॅक्वा जॅमर ५ किमीपर्यंतचे ड्रोन सिग्नल शोधू शकते. मल्टी वेपनवर बसवलेल्या तीन तोफा एका वेळी नऊ शॉट्स एका त्रिकोणी स्वरुपात सोडतात, त्यामुळे शत्रूचा खात्मा होतो. शत्रुवर पाळत ठेवणारे कॅमेरे आता 24x7 काम करणार आहेत.त्यामुळे आता पाकिस्तानच्या कारवायांना आळा बसणार आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत १९१ पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घुसले, त्यापैकी १७१ पंजाब सेक्टरमध्ये आणि २० जम्मू सेक्टरमध् आढळले आहेत.
TATA समुह भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार
भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा (TATA) एअरबसवर सोपवण्यात आली आहे. कंपनी या विमानांची निर्मिती वडोदरा येथील प्लांटमध्ये करणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारत आत्मनिर्भरच्या दिशेने फाऊले टाकत आहे. केंद्र सरकार देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारेच आता भारतीय वायुदलाचे C-295 हे विमान आता गुजरातमधील वडोदरा येथील टाट एअरबेसमध्ये बनवण्यात येणार आहे.
वडोदरातील ही सुविधा ४० विमाने बनवण्याव्यतिरिक्त हवाई दलाच्या आवश्यकतेसाठी अतिरिक्त विमाने तयार करेल. तसेच एअरबस स्पेनमधील त्यांच्या सुविधेमध्ये जे काम करते त्यापैकी ९६% काम भारतीय सुविधेत केले जाईल. विमानासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट सार्वजनिक क्षेत्रातील बीईएलद्वारे केले जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.