नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरनं भारतीय Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू केलं आहे. काल ट्विटरनं Chinar Corpsच्या 15 Corpsचे हे अकाऊंट सस्पेंड केलं होतं. Chinar Corpsही जम्मू-काश्मीरमधल्या एलओसीवर तैनात आहे. चिनार कॉर्प्स हे जम्मू-काश्मीरमधल्या भारतीय लष्करांचा महत्त्वाचा भाग आहे. जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी अभियानाची जबाबदारी चिनार कॉर्प्सवर आहे.मीडिया रिपोर्ट्नुसार, भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं, त्यानंतर ट्विटरशी संपर्क साधण्यात आला होता. ट्विटर काल संध्याकाळपर्यंत अकाऊंट पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं. Chinar Corpsचे ट्विटरवर फॉलोअर्स 40 हजारांच्या घरात आहेत. 1.8 मिलियन अकाउंटची पडताळणीदरम्यान Chinar Corpsचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.
ट्विटरकडून भारतीय सेनेच्या Chinar Corpsचं चुकून सस्पेंड केलेलं अकाऊंट पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 1:31 PM