जम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि राजौरी जिल्ह्यातील भारतीय चौक्या व नागरी क्षेत्रांना लक्ष्य करून मंगळवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमेपलीकडून गोळीबार आणि तोफमारा होण्याची गेल्या ३६ तासांतील ही सहावी वेळ आहे. पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी जम्मूच्या पल्लनवाला सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. सीमेपलीकडून मारा सुरूच असून, आमचे लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे, असे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल मनिष मेहता यांनी सांगितले. तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याने पहाटे पाच वाजून १५ मिनिटांनी राजौरी जिल्ह्यातील तीन क्षेत्रांत कोणत्याही चिथावणीशिवाय गोळीबार सुरू केला होता. त्यांनी उखळी तोफा, स्वयंचलित शस्त्रे आणि छोट्या शस्त्रांद्वारे झांगर, कलसियान आणि मकरी आदी भागांना लक्ष्य केले. या भागांतही चकमक सुरू असून, भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे. गेल्या २४ तासांत प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. सोमवारी पाकने चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. सीमेपलीकडून विविध भागांत तोफमारा करण्यात आला होता. यात पाच नागरिक जखमी झाले होते. शिवाय तोफगोळ्यांमुळे आॅईल कंटेनर पेटून पूंछ जिल्ह्यात अनेक दुकाने भस्मसात झाली होती. सीमावर्ती लोकांना सुविधा देण्याची मागणीजम्मू : नियंत्रण रेषेवरील पलानवाला-खोऊर भागात होणारा तोफमारा आणि गोळीबारापासून बचाव करण्यासाठी सीमावर्ती गावात उभारण्यात आलेल्या मदत छावण्यातील लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते तारा चंद यांनी राज्य सरकारला केली आहे. त्यांच्यावर कठीण वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय चौक्यांवर पाककडून मारा
By admin | Published: October 05, 2016 4:59 AM