नवी दिल्ली: एका बाजूला पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला असताना आता दुसऱ्या बाजूला चीनच्या सीमावर्ती भागात भारत-चीनचे सैनिक आमनेसामने आले. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बुधवारी बराच काळ धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. या भागातील भारतीय जवानांच्या उपस्थितीचा चिनी सैन्यानं विरोध केला. यानंतर दोन्ही देशाचे जवान एकमेकांना भिडले. त्यांच्यात काही वेळ धक्काबुक्की झाली. यानंतर या भागातील लष्कराची कुमक वाढवण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्यांमधील संघर्ष सुरू होता.
लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक आमनेसामने; धक्काबुक्कीमुळे तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 8:50 AM