बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरुच आहेत. सध्या बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. तसेच, बांगलादेशातून भारतात येणाऱ्या घुसखोरांचा अनेकदा चर्चेत असतो. अशातच भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. तसेच, 78 मच्छिमारांना भारतीय तटरक्षक दलाने अटक केली आहे. हे सर्व मच्छिमार बांगलादेशचे रहिवासी आहेत.
भारताच्या हद्दीत बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या दोन बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात घेतल्या आहेत. या अंतर्गत 78 बांगलादेशी मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय तटरक्षक दलाने समाज माध्यमांवर माहिती दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान, भारतीय सागरी क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली त्यांना जाणवल्या.
तपासादरम्यान बांगलादेशातील दोन मासेमारी करणाऱ्या नौका, एफव्ही लैला – 2 आणि एफव्ही मेघना – 5 या कोणत्याही परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आले. या दोन्ही नौकांची नोंदणी बांगलादेशात झाली आहे. आणि त्यात अनुक्रमे 41 आणि 37 एवढे मच्छीमार होते. भारतीय तटरक्षक दलाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही नौका अडवल्या आणि त्याचा तपास केला. यातून पकडलेल्या मच्छीमारांना पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.