नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात आतापर्यत २,९७८,२८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ८,५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांत भारतात ९,५०० हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. एका दिवसात मृतांची संख्याही प्रथमच ३०० च्या वर गेली आहे. मात्र एकीकडे कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढ होत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
...तर सहन करणंही कठीण होईल; चीनची भारताला पुन्हा धमकी
देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी खुलासा आहे.
मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे सांगण्यात येत होते. यावर बलराम भार्गव स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण छोट्या जिल्ह्यांमध्ये एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर शहरी भागात संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाचा समूह संसर्ग अजूनही झालेला नाही, असं दिसून येते, अशी माहिती बलराम भार्गव यांनी दिली आहे.
भारतात आतापर्यत ५० लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारांनी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रयोगशाळेचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन देखील बलराम भार्गव यांनी केले आहे.देशभरात लॉकडाऊन करत आपण जी पावलं उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळालं असल्याचं देखील बलराम भार्गव यांनी यावेळी सांगितले.