बंगळुरू : सध्या भारतीय संघ मायदेशात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकून रोहित सेनेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशातच भारताच्या काही आजी माजी क्रिकेटपटूंनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची बंगळुरू येथे भेट घेतली. खरं तर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पुढच्या काही महिन्यात कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. काल भारताच्या काही खेळाडूंनी राजभवन बंगळुरू येथे मोदींची भेट घेतली. ज्याचे फोटो व्यंकटेश प्रसादने शेअर केले आहेत.
दरम्यान, व्यंकटेश प्रसादने ट्विटच्या माध्यमातून फोटो शेअर करताना म्हटले, "आमच्या माननीय पंतप्रधानांना भेटून आनंद झाला. @narendramodi जी यांची काल राजभवन, बंगळुरू येथे माझ्या क्रिकेट सहकाऱ्यांसोबत भेट झाली. त्यांनी भारतातील क्रीडा पायाभूत सुविधा, ऑलिम्पिक आणि क्रीडा संस्कृती यासह विविध विषयांवर चर्चा केली."
खरं तर व्यंकटेश प्रसादव्यतिरिक्त इतरही भारतीय खेळाडूंनी मोदींची भेट घेतली. यामध्ये अनिल कुंबळे, श्रीशांत, मयंक अग्रवाल, मनिष पांडे या खेळाडूंचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"