महाविनाशकारी भूकंपात तुर्की आणि सिरिया हे देश उद्ध्वस्त झाले आहेत. या भूकंपात आतापर्यंत २४ हजारांवर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये केवळ तुर्की किंवा सिरियाचेच नाहीत तर अन्य देशांचे नागरिकही आहेत. भूकंपानंतरचा पाचवा दिवस भारतासाठी धक्का देणारा ठरला आहे.
Earthquake in Turkey: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय?
तुर्कीच्या भूकंपात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह एका हॉटेलच्या मलब्याखाली सापडला आहे. तुर्कीतील भारतीय दूतावासाने याची माहिती दिली आहे. विजय कुमार हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह मालत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला आहे. ते तुर्कस्तानला बिझनेस ट्रिपवर गेले होते.
दूतावासाने विजय कुमार यांचे कुटुंब आणि प्रियजनांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे नेण्याची व्यवस्था करत आहोत, असे दुतावासाने म्हटले आहे.
तुर्की आणि सिरीयामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे. अनेक देशांचे सैन्य तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मदतीसाठी पोहोचले आहे. भारताकडून एनडीआरएफची टीमही मैदानावर हजर आहे. मदत साहित्यही पोहोचवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आपले लष्करी रुग्णालय देखील उघडले आहे. मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.