नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यानं कुवेतमधील एका भारतीय हल्ला झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदारानं या प्रकरणी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. फेसबुकवर पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यानं कुवेतमधील भारतीय चालकावर काही जणांनी हल्ला केल्याचं उडुपी चिकमंगळूरच्या भाजपा खासदार शोभा कारंदलाजे यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. कारंदलाजे यांच्या दाव्यावर अद्याप सरकारकडून कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही.कारंदलाजे यांनी एका व्हायरल व्हिडीओवरुन गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण नावाच्या एका भारतीय चालकाला काही जण शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं दिसत आहे. प्रवीण केरळाचा रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. २८ एप्रिलला कुवेतमध्ये प्रवीणला मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. दहा जणांनी प्रवीणच्या घरात शिरून त्याला मारहाण केली. त्यांनी फेसबुकवरील व्हिडीओबद्दल प्रवीणला माफी मागायला लावली, असादेखील दावा करण्यात आला आहे. टाईम्स नाऊनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यानं कुवेतमध्ये भारतीय चालकाला मारहाण, अशा आशयाचा व्हिडीओ अनेकांनी गेल्या काही दिवसांत शेअर केला आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल अद्याप सरकारनं भाष्य केलेलं नाही. गेल्याच महिन्यात कर्नाटकमधल्या भाजपा खासदार शोभा कारंदलाजे यांनी कोरोना रुग्णांबद्दल एक खोटी बातमी ट्विटरवर शेअर केली होती. बेगलावी जिल्हा रुग्णालयांमधील कोरोना रुग्ण गैरवर्तन करत असल्याची माहिती त्यांनी ट्विट केली होती. उपायुक्त एस. बी. बोम्मनाहल्ली यांनी व्हिडीओ अधिकृत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला
CoronaVirus : आम्हाला कुत्र्यासारखं पळवून लावलं; आता परतणार नाही; सूरत सोडताना मजुरांचा संताप
चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा
CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना
Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार