शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

"पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही दिवशी भारताचा तिरंगा फडकताना दिसू शकतो"; केंद्रीय मंत्र्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 4:31 PM

"पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत"

Indian Flag in PoK - Pakistan Occupied Kashmir , Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानने गेल्या काही दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या काही भागावर दावा सांगितला आहे. पाकव्याप्त काश्मीर असे त्या भागाला म्हटले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत PoK चा ताब्यात घेणार का? पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात सामील होणार का? अशा विविध चर्चांनी सध्या जोर धरला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणामुळे या चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. याच दरम्यान आता केंद्रीय गृह राज्यमंत्री निसीत प्रामाणिक यांनी एका विशेष मुलाखतीत अतिशय महत्त्वाचे विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही दिवशी तिरंगा फडकवला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

अमित शहांच्या वक्तव्याबाबत काही दिवसांपूर्वीपासून चर्चा सुरू होतीच. त्यातच आता निसित प्रामाणिक यांनी टीव्हीनाइनबांगलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे काटेकोर आणि ठाम प्रकारचे निर्णय घेणारे लोक असताना कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. जर काश्मीरमधून कलम 370 हटवता येत असेल आणि लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवता आला असेल तर एक दिवस तुम्ही सकाळी उठून पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकतानाही पाहू शकता. तसे झाल्यास आश्चर्य वाटायला नको."

"देशाचे नेतृत्व सध्या दोन बलवान लोक करत आहेत. ते देशाच्या सन्मानासाठी आणि हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू शकतात. भाजपा पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानते हे अनेकांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सारेच तसे मानतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी PoK भारतात सामील होईल का, हे मी सांगू शकत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत. कलम ३७० हटवण्याच्या २ दिवस आधीपर्यंत याबाबत कोणतीही माहिती नव्हती. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ते निर्णय घेतात," असे प्रामाणिक यांनी स्पष्ट केले.

"पीओके अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, परंतु तो भारताचा भाग आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. काश्मीरमधील जागावाटपाच्या बाबतीत आम्ही पीओकेमधील जागा राखून ठेवल्या आहेत आणि उमेदवारांना नामनिर्देशित केले आहे. त्यामुळे मला इतकेच सांगायचे आहे की, पंतप्रधान आणि गृहमंत्री जे काही सांगतात, ते अंमलात आणतात," असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी केले.

 

 

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकJammu Kashmirजम्मू-काश्मीर