अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डलाश शहरात एक शॉपिंग मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. मॉलमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला, त्यामध्ये लहान मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला जागीच ठार केलंय. दरम्यान, या गोळीबारात भारतातील एक २७ वर्षीय युवती ठार झाली आहे. ऐश्वर्या थाटिकोंडा असं या तरुणीचं नाव असून ती हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवाशी होती. विशेष म्हणजे रंगारेड्डी जिल्ह्याचे न्यायाधीश नरसीरेड्डी हे आहेत.
टेक्सासमधील एलन प्रिमियम आऊटलेट मॉलमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने एकट्यानेच हा गोळीबार केला. हा गोळीबार सुरू असताना, एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला ठार केले. दरम्यान, पोलिसांनी या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा जाहीर केला नव्हता. मात्र, या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यात ऐश्वर्यालाही आपले प्राण गमवावे लागले. ऐश्वर्या ही सिव्हील इंजिनिअर होती, ती परफेक्ट जनरल कॉन्ट्रॅक्टर्स कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत होती.
ऐश्वर्याचे कुटुंब रंगारेड्डी जिल्ह्यातील सरुरनगर येथे राहत आहे. शहरातील एका महाविद्यालयातून सिव्हील इंजिनिअरची पदवी घेतली होती. त्यानंतर, ऐश्वर्याने अमेरिकेत जाऊन यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे, शिक्षणानंतर २ वर्षांपासून ती तेथे एका प्रोजेक्टवरह काम करत होती. गोळीबाराच्या घटनेपूर्वी तिने कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. मात्र, गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तिच्याशी संवाद होऊ शकल नाही, अशी माहिती रेड्डी कुटुंबीयांच्या जवळील नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, या घटनेवर राजी रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिकेतील बंदुक संस्कृतीवर अधिकाऱ्यांनी चाप बसवायला हवा. अमेरिकेच्या टेक्सास शहरात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच, या गोळीबाराच्या घटना वाढत असल्याचं रेड्डी यांनी म्हटलं.