शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

आता चीनचं 'टेन्शन' वाढणार, भारताची ताकद पहिल्यांदाच रशियात दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 3:30 PM

विशेष म्हणजे रशियाच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रित केलं आहे.

नवी दिल्लीः भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या तुकड्या रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये कसरती करताना पाहायला मिळणार आहेत. 2015मध्ये झालेल्या अशाच परेडवेळी फक्त भारताच्या लष्करानं सहभाग घेतला होता. परंतु यंदा भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या तुकड्या यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे रशियाच्या पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रित केलं आहे. कोरोनाच्या संकटापायी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, परंतु तिन्ही सैन्य दलाच्या तुकड्या या कार्यक्रमात भारताची ताकद जगाला दाखवणार आहेत.भारताचं सैन्य रशियात जाऊन परेड करणार असल्यानं रशियाशी सलोख्याचे संबंध असलेल्या चीनच्या चिंताही वाढल्या आहेत. रशिया दरवर्षी 9 मे रोजी विजय दिन परेड आयोजित करते. यावर्षी कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. ही परेड 1945मध्ये नाझींच्या जर्मनीनं आत्मसमर्पण केल्याच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. गेल्या वर्षी व्लादिवोस्तोक येथे झालेल्या बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांना यावर्षी येण्याचे आमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गैरहजेर राहणार असले तरी या परेडमध्ये भाग घेण्यासाठी 19 जूनला नौदल, हवाईदल आणि लष्कराचे 75-80 जवान मॉस्कोला पाठविण्यात येणार आहे. यावर्षीच्या परेडसाठी रशियाने अनेक देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले, कारण यावर्षी नाझींवर विजय मिळवण्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणार आहे. भारताच्या तिन्ही दलांचं सैन्य यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, जगालाही ते पाहता येणार आहे. सध्या परेडसाठी काम सुरू आहे. रशियाचे चीनशी सखोल सैन्य आणि राजकीय संबंध आहेत, तर सध्या सीमेवरील वादावरून भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. त्याचबरोबर भारताचेही अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. त्याच वेळी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष आहे. ही सर्व समीकरणे असूनही भारत आणि रशिया एकमेकांना महत्त्वाचे सहयोगी म्हणून पाहतात. रशियाबरोबर संरक्षण सहकार्य सतत वाढवण्याच्या प्रतिबद्धतेव्यतिरिक्त लष्करी उपकरणे एकत्रितपणे विकसित करण्याचे भारतानं करार केलेले आहेत. 

हेही वाचा

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश

पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत