Indian Navy AI based Commander : चीन स्वतःला जगातील सर्वात मोठी नौदल शक्ती म्हणवतो, पण चीनचे लवकरच गर्वहरण होणार आहे. कारण भारताच्या शौर्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) युग 'ब्लू झोन'मध्ये सुरू होणार आहे. भारतीय नौदलाच्या प्रत्येक युद्धनौकेला नवीन 'एआय कमांडर' मिळणार आहे. हा कमांडर अचूक आकडेमोड करेल आणि शत्रूचा सामना कसा करायचा आणि कधी आणि कोणत्या शस्त्राने हल्ला करायचा हे सांगेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, तंत्रज्ञान हे आता जीवनावश्यक आहे. आपण ते टाळू शकत नाही. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात प्रवेश करत आहोत आणि ते बळकट केले पाहिजे. आता नौदल पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या गोष्टीची अंमलबजावणी करत आहे. भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आता नौदल एआयने सुसज्ज असेल.
सर्व उत्तरे AI देणार...
भारतीय नौदलाने नवीन संरक्षण इकोसिस्टम विकसित केली आहे. ही संरक्षण इकोसिस्टम स्वावलंबी आणि आधुनिक आहे. ती मानवी बुद्धिमत्तेबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज आहे. शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे, विशिष्ट परिस्थितीत कोणते शस्त्र शत्रूविरुद्ध सर्वात मारक ठरेल, रॉकेट कधी लाँच करायचे, क्षेपणास्त्रे कधी डागायची, शत्रूच्या पाणबुड्या आणि जहाजे टॉर्पेडोने कधी नष्ट करायची, हे प्रश्न असतात, त्याची उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देणार आहे.
प्रत्येक युद्धनौका AI प्रणालीने अपडेट केली जाईल!
भविष्यातील युद्धांसाठी सज्ज होणारे भारतीय नौदल एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. भविष्यातील युद्धाच्या तयारीसाठी, भारतीय नौदल सायबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बिग डेटा अनालिटिक्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण क्षमतेने वापर करत आहे. या मेगा प्लॅननुसार भारतीय नौदलाची प्रत्येक युद्धनौका आधुनिक एआय प्रणालींसह अपडेट केली जाईल.