भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 ऑगस्ट 2023 रोजी कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स (GRSE) द्वारे तयार करण्यात आलेल्या लढाऊ जहाजाचे उद्घाटन होणार आहे. 'विंध्यगिरी' (Vindhyagiri), असे या युद्धनौकेचे नाव आहे. हा एक निलगिरी क्लास फ्रिगेट आहे, जी एक स्टेल्थ गायडेड मिसाइल युद्धनौका आहे.
निलगिरी क्लास फ्रिगेट्सला माजगांव डॉक आणि गार्डेन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स तयार करत आहेत. या अंतर्गत सात युद्धनौका तयार केल्या जाणार असून, पाच लॉन्च झाल्या आहेत आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत भारतीय नौसेनेत सामील होतील. लॉन्च केलेल्या फ्रिगेट्सची नावे- निलगिरी, उदयगिरी, तारागिरी, हिमगिरी आण दूनागिरी आहेत.
आता सहावा फ्रिगेट विंध्यगिरी लॉन्च होणार आहे. ही यु्द्धनौका 488.10 फूट लांब असून, याचे बीम 58.7 फूट आहे. यात दोन MAN डिझेल इंजिन लावण्यात आले आहे. याशिवाय, 2 जनरल इलेक्ट्रिकचे इंजिनदेखील आहेत. म्हणजेच, हे एक इलेक्ट्रिक-डिझेल युद्धनौका आहे. याचा कमाल वेग 59 किलोमीटर प्रतितास आहे. यात एकाचवेळी 35 अधिकाऱ्यांसह 226 नौसैनिक तैनात होऊ शकतात.
विंध्यगिरीमध्ये DRDO ने बनवलेले इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुयट शक्ती लावण्यात आले आहे. याशिवाय, दोन काउंटरमेजर सिस्टीमदेखील आहेत. तसेच, 4 कवच डेकॉय लॉन्चर्स, 2 एनएसटीएल मारीच टॉरपीडो काउंटरमेजर सिस्टीमदेखील आहे. नौकेतून हवेत हल्ला करण्यासाठी 4x8 सेलवाले व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम आहेत.
यासोबतच, अँटी-सरफेस वॉरफेअरसाठी 1x8 सेलवाला व्हर्टिकल लॉन्च सिस्टम असून, याद्वारे 8 ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइल फायर केल्या जाऊ शकतात. अँटी-सबमरीन वॉरफेयरसाठी दोन ट्रिपल ट्यूब टॉरपीडो लॉन्चर्स आहेत. यातून वरुणास्त्र मिसाइल फायर होतील. यात 2 आरबीयू-6000 अँटी-सबमरीन रॉकेट लॉन्चर्सदेखील आहेत. म्हणजेच यातून एकाचवेळी 72 रॉकेट्स फायर केले जाऊ शकतात.