ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - इराकमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय नर्सेसच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून अखेर त्यांची सुटका होणार आहे. उद्या विशेष विमानाने या सर्व नर्सेस भारतात मायदेशी परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आहे.
इराकमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अनेकांना टिकरीमध्ये बंदीस्त केले होते. त्यामध्ये ४६ भारतीय नर्सेसचा समावेश होता. यामध्ये अधिक नर्सेस या केरळच्या आहेत. या सर्व नर्सेसची सुटका होणार असून थोड्याच वेळात त्यांना अर्बिल एअरपोर्टवर नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच एका विशेष विमानाने त्यांना भारतात पाठवले जाणार आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसने ही माहिती दिली असून उद्या या नर्सेसना विशेष विमानाने कोच्ची एअरपोर्टवर आणण्यात येईल.