नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गृहसचिव स्तरावरील चर्चा संपताच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, पण हल्ला झाला, तेव्हा पाकच्या आग्रहाखातर भारतीय गृहसचिव इस्लामाबादेत एक दिवस थांबले होते, असे आता उघड झाले आहे.दोन्ही देशांची २६ नोव्हेंबर रोजी चर्चा समाप्त झाली होती. त्याच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी तत्कालीन गृहसचिव मधुकर गुप्ता आणि अन्य काही अधिकारी पाकिस्तानातील रमणीय हिल स्टेशन मरी येथे थांबले होते. साडेसात वर्षांनंतर या प्रकरणाची माहिती उघड झाली आहे. मुंबईवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतरही गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात थांबण्याची योजना का आखली? या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्या वेळी गुप्ता यांच्यासोबत अतिरिक्त सचिव (बॉर्डर मॅनेजमेंट), अन्वर अहसान अहमद, संयुक्त सचिव (अंतर्गत सुरक्षा) दीप्तिविलास व अन्य अधिकारी होते.पाकचे गृहमंत्री त्या वेळी दौऱ्यावर होते. त्याची भारतीय अधिकाऱ्यांनी भेट घ्यावी, असा पाक अधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्या वेळी गृहमंत्रालयात असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चर्चा समाप्त झाल्यानंतरही भारतीय अधिकारी तेथे एक दिवस जास्त का राहिले? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.’ (वृत्तसंस्था)चर्चा संपल्यानंतर मुक्काम का?मुंबईवर हल्ला झाला असतानाही २७ नोव्हेंबरपर्यंत अधिकाऱ्याचा दौरा चालूच होता. मुळात चर्चा संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिथे थांबण्याचे कारण नव्हते. मुंबईवर हल्ला झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे थांबणे तर गैरच होते.
...तेव्हा भारतीय अधिकारी पाकच्या पाहुणचारात मग्न!
By admin | Published: June 12, 2016 1:59 AM