शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

भारतीय संसद सार्वभौम नाही

By admin | Published: November 30, 2015 1:00 AM

भारतीय संसद सार्वभौम नसून संसदेतील निर्णयांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे सांगत प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना धारेवर धरले आहे

कोची : भारतीय संसद सार्वभौम नसून संसदेतील निर्णयांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे सांगत प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना धारेवर धरले आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर जेटलींनी टीका केल्याबद्दल जेठमलानींनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.हा आयोग म्हणजे जुने भ्रष्ट सरकार आणि नवे भ्रष्ट सरकार यांच्यातील पूर्ण ऐक्याची फलश्रुती आहे, असा आरोपही जेठमलानींनी केला. भारतीय दंड संहिता १८६० मध्ये अस्तित्वात आल्याच्या १५५ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय लोकशाही ही निवडून न आलेल्यांची जुलूमशाही बनू शकत नाही, असे विधान करीत जेटलींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली होती. तुम्ही कोणत्याही राजकारण्याला विशेषत: पंतप्रधानांना विचारा, ते भारतीय संसद सार्वभौम आहे असेच सांगतील. (वृत्तसंस्था)एलएलबीच्या किंवा राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला मात्र संसद ही सार्वभौम नाही हेच माहीत आहे, तथापि इंग्लंडची संसद सार्वभौम आहे, कारण तेथे संसदेने केलेले कायदे न्यायालयाला बाजूला सारता येत नाहीत, असे जेठमलानींनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)