Indian Railway: भारतात रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. ट्रेनमध्ये आवडीची सीट मिळविण्यासाठी अनेकजण कित्येक दिवस अगोदरच तिकीट बुकिंग करुन ठेवतात. लोअर बर्थ किंवा साइड लोअर बर्थसाठी बहुतेक लोकांची पसंती असते. पण आता अनेकांना ही सीट बुक करता येणार नाही. भारतीय रेल्वेने यासाठी आदेश जारी केला आहे.
दिव्यांगांसाठी राखीवसरकारी आदेशानुसार, ट्रेनची लोअर बर्थ काही ठराविक प्रवाशांसाठी राखीव असणार आहे. हे ठराविक लोक म्हणजे, दिव्यांग किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी ट्रेनची लोअर बर्थ आरक्षित असणार आहे. त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अशी मिळेल सीटरेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, दिव्यांगांसाठी स्लीपर क्लासमधील चार जागा, 2 लोअर 2 मिडल, थर्ड एसीमध्ये दोन जागा, एसी 3 इकॉनॉमीमध्ये दोन जागा राखीव असतील. तो किंवा त्याच्यासोबत प्रवास करणारे लोक या सीटवर बसू शकतील. तसेच, गरीब रथ ट्रेनमध्ये 2 खालच्या आणि 2 वरच्या जागा अपंगांसाठी राखीव असणार आहेत. त्यांना या जागांसाठी पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना न मागता सीटभारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना न मागता लोअर बर्थ देते. स्लीपर क्लासमध्ये 6 ते 7 लोअर बर्थ, प्रत्येक थर्ड एसी कोचमध्ये 4-5 लोअर बर्थ, प्रत्येक सेकंड एसी कोचमध्ये 3-4 लोअर असतात. हे बर्थ 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी आरक्षित आहेत. कोणताही पर्याय न निवडता त्यांना जागा मिळतात.