नवी दिल्ली : अनेक लोकांचे चारधाम यात्रा करण्याचे स्वप्न असते. आता भारतीय रेल्वे हे स्वप्न पूर्ण करणार आहे. भारतीय रेल्वे चारधाम क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल कनेक्टिव्हिटीवर काम करत आहे. रेल्वेने यासाठी सर्व्हे करण्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण केले आहे. 'चार धाम प्रकल्प' अंतर्गत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे रेल्वे जोडली जात आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे लाखो भाविकांसाठी चारधाम यात्रा सुलभ करणार आहे. उत्तराखंडच्या पवित्र भूमीतील गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट देण्यासाठी भाविकांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे," असे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
या संपूर्ण प्रकल्पातील बहुतेक भाग दुर्गम डोंगराळ भागातील असणार आहे. यासाठी रेल्वेला बऱ्याच ठिकाणी बोगदेही तयार करावे लागतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मार्ग गंगोत्री आणि यमनोत्रीला जाईल. त्याचबरोबर बद्रिनाथ आणि केदारनाथ लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल.
मीडिया रिपोर्टनुसार, ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत लाइन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. या १२५ किमी मीटर लांबीच्या लाइनमधील १०५ किमी मीटर ट्रॅक हा बोगद्यातून जाईल. या मार्गाच्या दरम्यान एकूण १२ स्थानके बांधली जात आहेत. रेल्वे स्थानक आणि बोगद्याचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. पाच बोगदे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या व्यतिरिक्त डोईवाला उत्तरकाशी बारकोट रेल्वे मार्गावर रेल्वेने योजना आखली आहे. हा रेल्वे मार्ग १२२ किमी लांबीचा असणार आहे.
आणखी बातम्या...
बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंदने उघडली बँक, उद्या चलन लाँच करणार
स्वदेशी कोरोना लसींबाबत खूशखबर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कधी मिळेल!
आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन