नवी दिल्ली - जर तुम्ही प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. अनेक प्रवासी ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळावी यासाठी अनेक दिवस आधी बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता कन्फर्म तिकीट नाही मिळाली तरी काही अडचण येणार नाही. कारण जर कुठल्याही ट्रेनमध्ये सिट रिकामी झाली तर तुम्हाला याची माहिती त्वरित मिळणार आहे. तसेच तुम्ही झटपट तिकीट बुक करू शकाल. तसेच त्याशिवायही तुम्हाला अनेक सुविधा मिळतील. जाणून घेऊयात आयआरसीटीसीच्या नव्या सुविधेविषयी.
दरम्यान, तुम्ही जर आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तिकीट बुक केलं, तर तुम्ही सर्व ट्रेनमध्ये सिटची अव्हेलेब्लिटी पाहू शकाल. जर सिट रिकामी असेल तर तुम्ही बुक करू शकाल. मात्र जर सिट खाली नसेल तर तुम्ही नशिबाच्या भरोशावर वेटिंगची तिकीट खरेदी करता. मात्र वेटिंग खूपच असेल तर बुकिंग केलं जात नाही. जर कुठलीही सिट खाली झाली. तर त्याची माहिती कशी मिळेल याची सुविधा नव्हती. आता आयआरसीटीसीने आपल्या प्रवाशांना ही सुविधा दिली आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंक अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरटीसी) ने पुश नोटिफिकेशनची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे युझर्सना सिटच्या उपलब्धतेसह अनेक प्रकारच्या सुविधांची माहिती मिळणार आहे. आयआरसीटीसीमधून युझर्सना सिटच्या उपलब्धतेसह विविध प्रकारच्या सुविधांची माहिती मिळणार आहे. आयआरसीटीसीने हल्लीच आपली वेबसाईट अपडेट केली आहे. त्यामध्ये अनेक नव्या सुविधा जोडल्या आहेत. जेव्हा एखादी सीट कुठल्याही ट्रेनमध्ये रिकामी होईल, तेव्हा याचं नोटिफिकेशन युझर्सच्या मोबाईलवर जाईल. त्यानंतर युझर्स आपल्या सोईनुसार आवश्यक असल्यास ती रिक्त सिट बुकिंग करू शकतात. त्यासाठी युझर्सला सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन पुश नोटिफिकेशनच्या सुविधेचा लाभ घ्यावा लागेल.
समजा तुम्ही कुठल्याही ट्रेनमधून कुठल्याही निश्चित तारखेला सीट बुक करत असाल, मात्र तुम्हाला ट्रेनमध्ये जागा उपलब्ध दिसत नसेल तर तुम्ही तिकीट बुक करणार नाही. त्यानंतर तुम्ही जेवढ्या ट्रेनमधील तिकिटांची उपलब्धता चेक केली असेल, त्यात जर कुठल्या प्रवाशाने आपलं तिकीट रद्द केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. या एसएमएसमध्ये ट्रेन नंबरची माहितीही असेल. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर त्वरित हे तिकीट बुक करून प्रवास करू शकता.
जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाईट उघडता तेव्हा तुम्हाला पुश नोटिफिकेशनचा पर्याय दिसेल. ग्राहक ही सेवा अगदी विनामूल्य सब्स्क्राइब करू शकतात. त्यासाठी त्यांना आयआरसीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल, तसेच ही सुविधा सब्स्क्राइब करावी लागेल. आयआरटीसीचे सध्या ३ कोटींहून अधिक युझर्स आहेत.