नवी दिल्ली - भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. पण तुमच्या रेल्वे प्रवासाच्या भाड्यापैकी अर्ध्याहून अधिक रकमेचं वहन हे स्वतः रेल्वेकडून केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?
रेल्वे प्रवाशांच्या एकूण भाड्यावरील सब्सिडीपोटी रेल्वेने ६२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तुमच्या रेल्वे प्रवासावर होणाऱ्या खर्चापैकी अर्ध्याहून अधिक रकमेचा भार हा रेल्वेकडून उचलला जातो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे प्रवासी भाड्यावर ५५ टक्क्यांहून अधिक रकमेची सवलत देते. यावर्षी केवळ भाड्याच्या रकमेवर ६२ हजार कोटी रुपये खर्च झाले.
याचा अर्थ तुमच्या रेल्वे प्रवासावर खर्च होणाऱ्या १०० रुपयांपैकी ५५ रुपये हे रेल्वेकडून खर्च केले जातात तर रेल्वेच्या तिकिटापोटी ४५ टक्के रक्कम खर्च केली जाते. गेल्या वर्षात तिकिटावरील सब्सिडीपोटी ६२ हजार कोटी रुपये खर्च केले.