नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र यानंतर अनलॉकच्या माध्यमाने देशातील कामकाज हळू-हळू सुरू करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रे खुली केली जात आहेत. भारतीयरेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. आता पुन्हा भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनलाही सुरुवात होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी आज ही माहिती दिली. 80 नव्या रेल्वेगाड्या अथवा 40 जोडी रेल्वे 12 सप्टेंबरपासून सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
आवश्यकता भासेल तेथे क्लोन रेल्वेगाडी चालवली जाणार -रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आवश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. याशिवाय परीक्षांसाठी अथवा अशाच एखाद्या कारणासाठी राज्य सरकारने मागणी केल्यास रेल्वेगाड्या चालवल्या जातील.
यादव म्हणाले, कोरोनाचा परिणाम भलेही काही निविदा आणि भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर झाला असेल. मात्र, बुलेट ट्रेन योजना योग्य प्रकारे सुरू आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रेल्वे रुळांच्या बाजू असलेला कचरा दिल्ली सरकार आणि रेल्वेकडून संयुक्तपणे हटवला जात आहे.
लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे नुकसान -कोरोनाचा फटका संपूर्ण जगालाच बसला आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाउन काळात रेल्वे बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे. अहवालाप्रमाणे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एकट्या पश्चिम रेल्वेचे 1,837 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. नुकतीच सरकारने अनलॉक-4ची घोषणा केल्यानंतर रेल्वेकडून ही घोषणा करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
क्रिकेटशी संबंधित 'या' व्यक्तीला कोरोनाची लागण; सचिन धावला मदतीला, संपूर्ण खर्च उचलणार
ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात
लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा