नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवादेखील बंद राहणार आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असेल. रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मालगाड्या सुरू असतील. तर मुंबईतील लोकल सेवा आज रात्रीपर्यंत सुरू असेल. यानंतर ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लोकल सेवा बंद करण्यात येईल.
Coronavirus: मोठा निर्णय! ३१ मार्चपर्यंत रेल्वेकडून सर्व प्रवासी गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 1:19 PM