भारतीय रेल्वेनं कटरापासून बनिहाल सेक्शनपर्यंत उभारल्या जात असलेल्या Arch of Chenab Bridge चं काम पूर्ण केलं आहे. हा जगातील सर्वात उंच Arch Bridge आहे. हा उधमपूर. श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक योजनेचा भाग असून याद्वारे कटरापासून थेट श्रीनगरपर्यंत रेल्वे नेता येऊ शकते. Arch of Chenab Bridge हा जम्मू काश्मीरमधील रेल्वेचं जाळं अधिक मजबूत करण्यास मदत करेल. याशिवाय राज्याच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा ब्रिज तयार झाल्यामुळे खोऱ्याला ट्रेन सेवांशी जोडणं शक्य आहे. तसंच अन्य आर्थिक देवाणघेवाणीलाही चालना मिळणार आहे. हा ब्रिज चिनाब नदीवर उभारण्यात आला आहे. हा ब्रिज ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी पर्वतांची जमीन ही कच्ची आहे. तसंच अनेक आव्हानं पार करून हा ब्रिज तयार करण्यात आला आहे. केबलच्या सहाय्यानं हा ब्रिज तयार करण्यात आला आहे.
Video : Indian Railway नं जगातील सर्वात उंच Arch of Chenab Bridge चं काम केलं पूर्ण; पाहा मनमोहक दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:26 PM
३३१ मीटर म्हणजेच आयफेल टॉव्हरपेक्षाही उंच आहे हा ब्रिज, जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचं जाळं मजबूत करण्यास फायदा
ठळक मुद्दे३३१ मीटर म्हणजेच आयफेल टॉव्हरपेक्षाही उंच आहे हा ब्रिजजम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचं जाळं मजबूत करण्यास फायदा