Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:43 PM2021-07-23T13:43:19+5:302021-07-23T13:47:37+5:30

Indian Railways: भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करत आधुनिकीकरणाची कास धरत आहे.

indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water | Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

Indian Railways: रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

Next
ठळक मुद्देरेल्वेचे डबे स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानहजारो लीटर पाणी आणि वेळेची होणार बचत ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांटसाठी २ कोटींचा खर्च

नवी दिल्ली: कोरोना कालावधीत भारतीय रेल्वेची सेवा काही काळ बंद होती. अनेक महिन्यांनंतर रेल्वेच्या काही प्रवासी सेवा सुरू करण्यात आल्या. या कालावधीत रेल्वेने मालवाहतुकीवर मोठ्या प्रमाणात भर दिल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. कोरोना काळात स्वच्छतेला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक भन्नाट तंत्रज्ञान आणले असून, केवळ ७ मिनिटांत संपूर्ण ट्रेन स्वच्छ होऊ शकणार आहे. इतकेच नव्हे, तर हजारो लीटर पाण्याचीही बचत होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. (indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water)

भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करत आधुनिकीकरणाची कास धरत आहे. रेल्वेचे डबे स्वच्छ, साफ आणि टापटीप राहण्यासाठी रेल्वेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांट विकसित केला आहे. यामुळे वेळ आणि पाणी या दोन्हीची मोठी बचत होईल, असे सांगितले जात आहे. 

मस्तच! आता मुंबई, बंगळुरु, दिल्लीकडे रोजगार निर्मितीचे नेतृत्व; ‘या’क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ

कुठे आहे ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांट?

मध्य प्रदेशमधील भोपाळजवळ असलेल्या हबीबगंज रेल्वे यार्ड येथे भारतीय रेल्वेकडून ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांट लावण्यात आला आहे. यामुळे २४ डब्यांची ट्रेन अवघ्या ७ मिनिटांत बाहेरून स्वच्छ होऊ शकेल. या प्लांटमुळे सुमारे १० हजार लीटर पाण्याची बचत होणार आहे. या प्लांटची चाचणी योग्य पद्धतीने पार पडल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्लांट कार्यान्वित केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. ७० मीटर लांबीच्या प्लांटसाठी २ कोटी खर्च आल्याची माहिती मिळाली आहे. 

अबब! चीनची सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन; ताशी वेग ६०० किमी, हजार किमीचा प्रवास २.५ तासांत

दरम्यान, पारंपारिक पद्धतीने रेल्वेचे डबे स्वच्छ करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. रेल्वे कर्मचारी हाताने रेल्वेचे डबे स्वच्छ करतात. यासाठी सुमारे १५ हजार लीटर पाणी लागते, असे म्हटले जाते. मात्र, आता अत्याधुनिक ऑटोमॅटिक वॉशिंग प्लांटमुळे केवळ ५ हजार पाणी रेल्वेचे डबे स्वच्छ करण्यासाठी लागेल. या प्लांटमधून ट्रेन गेल्यावर ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्सनी ट्रेनची स्वच्छता केली जाईल. अन्य ठिकाणीही या प्लांट भविष्यात लावले जातील, असे सांगितले जात आहे.  
 

Web Title: indian railways habibganj yard automatic washing plant clean train in 7 minutes and save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.