नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळणेही अवघड झाले आहे. यातच भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. तसेच यांपैकी आतापर्यंत 169 कोरोना केअर कोच राज्यांना वापरासाठीदेखील सोपविण्यात आले आहेत. (Indian railways made 4000 Corona Care Coaches with 64000 beds)
दिल्लीत तयार करण्यात आले आहेत 75 कोरोना केअर कोच -महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या कोरोना केअर कोचचा वापरही सुरू झाला आहे. दिल्लीत 75 कोरोना केअर कोच तयार करण्यात आले आहेत. यांत तब्बल 1200 बेडची क्षमता आहे. 50 कोच शकुरबस्ती आणि 25 कोच आनंद विहारमध्ये लावण्यात आले आहेत.
CoronaVirus: धोकेबाज ड्रॅगन! चीननं आधी पुढे केला मदतीचा हात, आता भारताचा मेडिकल सप्लाय रोखला
पश्चिम रेल्वेच्या रतलाम डिव्हिजनने मध्य प्रदेशच्या इंदूर जवळील टिही स्टेशनवर 320 बेड असलेले 20 कोरोना केअर कोच लावले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद, भदोही, वाराणसी, बरेली आणि नजीबाबाद येथे 10-10 कोरोना केअर कोच लावण्यात आले आहेत. यांत एकूण 800 बेड आहेत.
महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 57 कोरोना बाधित करतायत कोरोना केअर कोचचा वापर - महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 57 कोरोना बाधित कोरोना केअर कोचचा वापर करत आहेत. यांतील एकाला शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच 322 बेड अद्यापही उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यातही कोरोना केअर कोच लावण्यात येत आहेत. या दृष्टीने, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, नागपूर आणि नागपूर महानगरपालिका कमिश्नर यांच्यात एका करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.
"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि तेथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ते आवश्यक असेल, तर तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याशिवाय, मागणी प्रमाणे, विविध जिल्ह्यांना मुबलक प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावे. जर आवश्यकता असेल, तर खासगी रुग्णालयांनाही निर्धारित दरांत रेमडेसिव्हिर द्यावात, असे आदेशही मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.
भाजप तयार करतेय जम्बो आयसोलेशन सेंटर -कोरोनामुळे मध्यप्रदेशची स्थितीही गंभीर आहे. राज्यात सीएम शिवराज सिंह चौहानही संपूर्ण प्रशासनासह कंबर कसून कोरोना महामारीचा सामना करताना दिसत आहेत. आता त्यांच्या पक्षानेही या संकट काळात कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. भाजपकडून भोपाळमधील लाल परेड मैदानातील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये एक हजार बेडचे क्वारंटाइन सेंटर तयार केले जात आहे.
ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल, त्यांना तो या सेंटरमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि तत्काळ रुग्णालयांतही पाठविले जाईल. येथे नर्सिंग स्टाफ शिवाय डॉक्टरदेखील 24 तास उपलब्ध राहतील. ही संपूर्ण व्यवस्था निःशुल्क असेल. भाजपच्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रुग्णांना दिवसभर, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आणि भजन ऐकायला मिळेल. यामुळे येथील वातावरण सकारात्मक होईल आणि रुग्णांचे मनोरंजनही होईल. एवढेच नाही, तर येथे रोज सकाळी आणि सायंकाळी रामायण मालिकाही दाखवण्यात येईल. इंडिया टीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.