नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारताचा चीनसमवेत तणाव वाढलेला असतानाच भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवर मालवेअर हल्ल्याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याद्वारे रेल्वेगाड्यांची ये-जा, यासह महत्त्वपूर्ण डेटा विदेशी देशांना पुरवला जात आहे, असा संशयही गुप्तचरांनी वर्तवला आहे.दरम्यान, रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी म्हटले आहे की, रेल्वेला मालवेअर सुरक्षेबाबत इशारे मिळत असतात. आमचे अभियंते याबाबत संपूर्ण सावधानता बाळगत असतात. डेटाचोरी रोखण्यासाठी फायरवॉल अपडेट करीत असतात.चीनची फर्म बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्चशी संलग्न असलेली ४७१ कोटी रुपये खर्चाची ४७१ किलोमीटर लांबीची सिग्नलिंग यंत्रणा रद्दबातल ठरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या दुसºयाच दिवशी हे वृत्त आले आहे, हे विशेष.गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेची यंत्रणा एपीटी ३६ मालवेअरच्या प्रभावाखाली आलेली आहे. ही प्रणाली इंटरनेटपासून तात्काळ डिस्कनेक्ट करावी व पासवर्ड बदलावा, असा सल्ला गुप्तचर यंत्रणेने रेल्वे बोर्डला दिलेला आहे. एपीटी ३६ मालवेअर पाकिस्तानशी जोडला गेलेला आहे आणि पाकचा नजीकचा सहयोगी देश चीन आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा मिळताच रेल्वेच्या प्रधान कार्यकारी संचालकांशी संबंधित सतर्कता खात्याकडून मालवेअर क्लिनिंगचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीटी ३६ मालवेअरद्वारे भारतीय रेल्वेच्या प्रणालीमधून डेटा चोरला जात आहे. तो विदेशात कोठे तरी स्टोअर केला जात आहे. यात रेल्वेच्या अवागमनाची संपूर्ण माहिती आहे. या हल्ल्याचा रेल्वेच्या किमान चार प्रणालींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या एपीटी मालवेअरने संरक्षण हालचालींची माहिती घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. प्रश्नांना उत्तरे देताना रेल्वे बोर्ड चेअरमनने सांगितले की, आमच्या की आयआरसीटीसीच्या यंत्रणेवर परिणाम झाला आहे, ते अद्याप पाहिले जात आहे. आम्ही फायरवॉल्स अपडेट करीत आहोत. ही प्रक्रिया सुरू आहे.मात्र, आमची काही माहिती फुटल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही. आमच्या प्रणाली सुरक्षित आहेत व आमच्या अभियंत्यांचे काम सुरूच आहे.>सेंट्रल पोलीस आॅर्गनायझेशनलाही इशारागुप्तचरांनी दिलेल्या इशाºयानुसार, मालवेअरचा धोका रेल्वेबरोबरच संरक्षण, सेंट्रल पोलीस आॅर्गनायझेशन्स, शिक्षण, आरोग्य क्षेत्रालाही आहे. या धोक्यामुळे संबंधित विभागांनी आपापले ई-मेलचे, तसेच आॅनलाईन सेवेचे पासवर्ड तातडीने बदलावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅक-अप घेऊन हार्ड डिस्क फॉरमॅट कराव्यात आणि आॅपरेटिंग सिस्टिम्स व इतर सॉफ्टवेअर्स रि-इन्स्टॉल करावीत, असेही सांगण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेला मालवेअर हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा, सुरक्षेचे उपाय करण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:08 AM