नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 392 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन (festival special trains) या नावाने सर्व गाड्या धावणार आहेत.
सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने सर्व विभागांत (Zonal Railways) उत्सव विशेष गाड्या (फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन) चालविण्यास मंजुरी दिली दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवल्या जातील. भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे परिमंडळांना या स्पेशल गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. यात काही गाड्या नियमित धावतील तर काही आठवड्यात तीन दिवस किंवा चार दिवस धावणार आहेत. याशिवाय साप्ताहिक गाड्याही धावणार आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) 15 ऑक्टोबरपासून नवीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मुंबई सेंट्रल-इंदूर सुपरफास्ट अवंतिका एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-ओखा सुपरफास्ट सौराष्ट्र मेल आणि वांद्रे टर्मिनस-रामनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 15 ऑक्टोबरपासून धावणार आहेत. याशिवाय, वांद्रे टर्मिनस-लखनऊ सुपरफास्ट एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस-भुज एसी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-एच निजामुद्दीन युवा एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचा समावेश आहे.
Special Trains List
festival special trains List
festival special trains List
festival special trains List