नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबार सुरू आहे. याला भारतीय जवानांनीही चोख आणि जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण दलाच्या जवानांनी सोमवरी आणखी दोन पाकिस्तानीसैनिकांचा खात्मा केला. गेल्या केवळ 3 दिवसांतच भारतीय जवानांनी तब्बल 17 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आहे. एवढेच नाही, तर यात पाकिस्तानच्या अनेक फॉर्वर्ड पोस्टचेही मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी पाकिस्तानी सैनिकांनी तब्बल दोन हजार वेळा सीज फायरचे उल्लंघन केले आहे.
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!
पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त -मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा, भारतीय लष्कराने केलेल्या जबरदस्त कारवाईत पीओकेच्या निकियाल भागात पाकिस्तानचे 6 सैनिक मारले गेले होते. तर आज सकाळी दोन सैनिक मारले गेले आहेत. या शिवाय पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तानच्या सिंध रेजिमेन्टचे होते. याशिवाय भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे एक डझनहून अधिक जवानही जखमी झाले आहेत. यापूर्वी 20 आणि 21 जूनलाही पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले होते.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ -पाकिस्तानी सैनिकांनी सर्वप्रथम भारतीय पोस्ट्सना निषाणा बनवत हल्ला केला. यानंतर भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांच्या या कारवाईत हाजीपीर सेक्टर, बदोरी सेक्टर, बगसर सेक्टर, जंदरोट आणि डेरा शेर खान भागात पाकिस्तानचे तब्बल 9 सैनिक मारले गेले आहेत.
नौशेरा सेक्टरमधये एका जवानाला वीरमरण -पाकिस्तानकडून सोमवारीही सीझ फायरचे उल्लंघण करण्यात आले. सकाळच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत गोळीबार केला. त्यांनी नौशेरा सेक्टर आणि पुंछमध्ये कृष्णा खोऱ्याच्या भागांत गोळीबार केला. यात भारताच्या एका जवानाला हौतात्म्य आले आहे.
गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले