लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय मसाल्यांचा तडका सर्वांना माहीत आहे; पण याच मसाल्यांचा वापर कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगावर उपचारासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट मिळवले. २०२८ पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
भारतीय मसाल्यांतून तयार करण्यात येणारी ही औषधी फुप्फुस, स्तन, मोठे आतडे, गर्भाशय, तोंड आणि थायरॉइड पेशींच्या कर्करोगाविरुद्ध चांगली प्रतिबंध क्षमता दाखवतात.
मसाल्यांचे औषधी गुणधर्मपारंपरिक कर्करोग उपचार थेरपीपेक्षा नॅनो-ऑन्कॉलॉजीचे अनेक फायदे आहेत. कोणतेही विषारी दुष्परिणाम नाहीत.भारतीय मसाल्याच्या तेलांची मुबलकता यामुळे निर्मिती सुलभ, खर्च कमी आहे. रुग्णांच्या जीवनाच्या गुणवत्तेत यामुळे सुधारणा होते.
चाचण्या यशस्वीसध्याच्या कर्करोगाच्या औषधांच्या बाबतीत त्याचे दुष्परिणाम आणि भरमसाठ किमती या समस्या आहेत. प्राण्यांवरील या औषधांच्या चाचण्या यशस्वी ठरल्या असून २०२७-२८ पर्यंत ती बाजारात उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवून वैद्यकीय चाचण्यांचे नियोजन केले जात आहे. सर्वसामान्य पेशीवर या औषधांचा दुष्परिणाम होत नाही, असा दावा संशोधकांनी केला.
भारतीय मसाल्याच्या तेलांचे वैद्यकीय फायदे युगानुयुगे ज्ञात असले, तरी त्यांच्या जैव उपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला आहे. सूक्ष्म मिश्रणातून (नॅनो-इमल्शन) ही मर्यादा प्रभावीपणे पार करता येते.- प्रा. आर. नागराजन, संशोधक, आयआयटी-मद्रास
औषधांच्या विकासामागील कारण म्हणजे कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ तसेच सर्व वयोगटातील होणारे मृत्यू, स्तन, फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कर्करोग हे जगभरात सामान्य मानले जातात. -एम. जॉयस निर्मला, मुख्य वैज्ञानिक अधिकारी, आयआयटी मद्रास