दुबई: सागरी प्रदूषणाची समस्या दिवसागणिक आक्राळविक्राळ रुप धारण करत आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र नव्या पिढीतील एकानंच यावर उपाय शोधून काढला. अबूधाबीत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यानं सागरी जीवन वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावू शकेल, अशा रोबोटची निर्मिती केली आहे. याशिवाय शेतीसाठी लागणारे श्रम कमी करू शकेल, असा रोबोटदखील या विद्यार्थ्यानं तयार केला. अतिशय उष्ण भागात या रोबोटचा वापर करता येऊ शकतो.दुबईतील जीईएमएस युनायटेड इंडियन स्कूलमध्ये शिकणाऱ्या साईनाथ मणीकंदननं मरिन बोट क्लिनर (एमबोट क्लिनर) तयार केला आहे. या रोबोटमुळे सागरी प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकेल. 'एमरोबोटमुळे पाण्यावर तरंगणारं प्लास्टिक गोळा करता येईल. एमबोटचा आकार एखाद्या बोटीसारखा आहे. एमबोट रिमोटनं कंट्रोल करता येते. यामध्ये दोन बॅटरी आहेत. त्यांच्या मदतीनं बोट पुढे सरकते,' अशी माहिती मणीकंदननं दिली.
मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 16:35 IST