- पवन देशपांडे, मुंबई रुपयाच्या तुलनेत डॉलर कितीही महाग होत असला आणि आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होत असली तरी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीनलाही मागे सोडत भारतीय विद्यार्थीसंख्येत या वर्षी २९ टक्के वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मैत्रीनंतर हा विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडे ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेने अमेरिकेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक खात्याच्या साहाय्याने तयार केलेला ‘ओपन डोअर्स’ अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचा कल यामध्ये दिलेला असून, त्यानुसार अमेरिकेत येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या गेल्या ३५ वर्षांमध्ये प्रथमच १० टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २९ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत चीन आघाडीवर असला तरी या वर्षी चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी वाढलेली दिसून आलेली नाही. ३ लाखांवर चिनी विद्यार्थ्यांनी या वर्षी अमेरिकेत प्रवेश घेतला आहे. अमेरिकन विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ झाली आहे. मात्र छोटेमोठे कोर्स करून परत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय विद्यार्थी अमेरिकेत काय निवडतात?इतर14.4%सामाजिक शास्त्र2.4%गणित/कॉम्प्युटर31.4%इंजिनीअरिंग37.5%व्यावसायिक10.7%आरोग्यसेवा3.6%कोणत्या अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला अधिक पसंती?22%इतर कोर्स12%पदवीपूर्व शिक्षण64%पदवी02%छोटे-मोठे कोर्स
अमेरिकेकडे वाढला भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ
By admin | Published: November 17, 2015 2:35 AM