वॉशिंग्टन : अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे.इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात भारताचे १,८६,२६७ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. भारतातून अमेरिकेत जाणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या १७.३ टक्के आहे. चीनने यात ६.८ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. त्यांचे ३,५०,७५५ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.अमेरिकेत महाविद्यालये आणि विद्यापीठात दहा लाख विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. हा आकडा नंतर १०.८५ लाखांवर पोहोचला आहे. अमेरिकेत अध्ययन करणाºया विदेशी विद्यार्थ्यात चीन, भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरब, कॅनडा, व्हिएतनाम, तायवान, जपान, मेक्सिको आणि ब्राझिल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)भारतात कमीच -देशाबाहेर शिक्षण घेणाºया अमेरिकन विद्यार्थ्यांची पसंती ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला असल्याचे दिसते. भारतात शिक्षण घेणाºया अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून, ती ४,४३८ वरून ४,१८१ झाली आहे.
अमेरिकेतील विद्यार्थ्यांत भारतीय दुस-या स्थानी, चीन प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:58 AM