नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या घसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या जवळ आला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशात लसीकरणाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणात सर्वाधिक वापर कोवॅक्सिन, कोविशील्डचा सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी स्पुटनिक लसदेखील उपलब्ध आहे. मात्र कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लस घेणाऱ्यांना आता वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.गुड न्यूज! Covishield घ्या किंवा Covaxin दोन्हीही लस उत्तम, पण सर्वात प्रभावी...; नवा खुलासा२५ वर्षीय मिलोनी दोषी कोलंबिया विद्यापीठात मास्टर्स डिग्री करू इच्छिते. तिनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच दोन डोस घेतले आहेत. मात्र कोवॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कॅम्पसमध्ये आल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावं लागेल, अशी सूचना कोलंबिया विद्यापीठात मिलोनीला देण्यात आली आहे. मात्र एका लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दुसऱ्या कंपनीची लस टोचून घेणं कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न मिलोनीला पडला आहे. अद्याप तरी यावर कोणत्याही डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांनी भाष्य केलेलं नाही.... तर देशांतर्गत विमान प्रवासासाठी RT-PCR निगेटीव्ह टेस्ट रिपोर्टची अट रद्दमिलोनी दोषीसारखे अनेक विद्यार्थी आहेत. अनेकांनी कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र त्यांना अमेरिकेत गेल्यावर पुन्हा लस घ्यावी लागणार आहे. अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेणं किती योग्य ठरेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मार्चपासून आतापर्यंत अमेरिकेतील ४०० हून विद्यापीठांनी लसीकरणाबद्दल सूचना जारी केल्या आहेत. कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आल्यावर पुन्हा लस घ्यावी, अशी सूचना विद्यापीठांकडून करण्यात आली आहे. कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लसीचा अद्याप डब्ल्यूएचओनं मान्यता दिलेली नाही. तर कोविशील्डला डब्ल्यूएचओकडून मंजुरी मिळाली आहे.