नवी दिल्ली : विविध देशांमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सध्याच्या परिस्थितीत देशात आणणे शक्य नाही. अशा परिस्थितीत त्यांनी जिथे आहे तिथेच थांबायला हवे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केली. भारताबाहेर असलेल्या देशवासीयांना परत आणण्यासंदर्भातील विविध याचिकांना स्थगिती देत न्यायालयाने हे आवाहन केले.
सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. एल. नागेश्वरराव आणि न्या. मोहन शांतनगौडर यांच्यासमक्ष या याचिका सुनावणीसाठी आल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विविध याचिका एकाच वेळी विचारात घेतल्या. विशेषत: ब्रिटनमधील एका विद्यार्थ्याला भारतात परत आणण्यासंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयाने जिथे आहात तिथेच थांबा, अशी सूचना केली. या प्रकरणात केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संबंधित विद्यार्थी आता ब्रिटनमध्ये सुरक्षित आहे. अमेरिकेत असलेल्या वयोवृद्ध तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासंदर्भातही एक याचिका दाखल करण्यात आली होती.विदेशींच्या ‘व्हिसा’त ३0 एप्रिलपर्यंत वाढच्व्हिसाची मुदत संपूनही आपापल्या देशात परत जाता न आल्याने भारतातच अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा आणि ई-व्हिसाची मुदत केंद्र सरकारने सोमवारी ३० एप्रिलपर्यंत वाढविली.च् याआधी अशा व्हिसांची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविली गेली होती. पण सध्याचे ‘लॉकडाउन’ संपण्याच्या आदल्या दिवशी केंद्रीय गृह मंत्रालयाने ही मुदत महिनाअखेरपर्यंत वाढवावी, हा एक तर ‘लॉकडाउन’ वाढण्याचे किंवा परदेशात जाणाऱ्या विमान सेवा पुन्हा सुरु न होण्याचा संकेत मानला जात आहे.च्ज्यांचे व्हिसा १ फेब्रुवारीपासून आधीच ंसपले आहेत किंवा यापुढे संपणार आहेत त्यांनी अशा मुदतवाढीसाठी आॅनलाईन अर्र्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे. संबंधित देशांच्या वकिलातींनी विशेष विमानाने आपापल्या नागरिकांना मायदेशी घेऊन जाण्याची व्यवस्था केली तर अशा प्रत्येक प्रकरणाची छाननी करून त्यासाठी परवानगी देण्याचे सरकारने ठरविले आहे.