ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - अमेरिकेमध्ये राहण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी 3 भारतीय दर आठवड्याला जवळपास 5 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 40 लाख रुपये खर्च करत आहेत. ईबी-5 इन्व्हेस्टर व्हिजा प्रोग्रॅम अंतर्गत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी हा खर्च करण्यात येतो आहे. ईबी-5 विदेशी नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना (21 वर्षांच्या मुलासह) ग्रीन कार्ड आणि कायम राहण्याचा अधिकार देतो. ग्रीन कार्ड आणि कायम राहण्यासाठी दोन पर्याय असतात. पहिल्या पर्यायात तुम्हाला 10 लाख डॉलर गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करावा लागतो आणि 10 अमेरिकन लोकांना पूर्ण वेळेचा पगार द्यावा लागतो. तर दुस-या पर्यायात सरकारच्या मान्यताप्राप्त ईबी- 5 व्हिजा प्रोग्रॅ अंतर्गत व्हिजा मिळवण्यासाठी 5 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 40 लाखांची गुंतवणूक करावी लागते. तसेच अमेरिकेतल्या ग्रामीण भागातील 10 हून अधिक लोकांना पूर्ण वेळ नोकरी द्यावी लागते. आम्ही कमी वेळात 210 गुंतवणूकदारांशी जोडले गेलो असून, त्यातील 42 गुंतवणूकदार हे भारतीय आहेत, अशी माहिती एलसीआर कॅपिटलचे पार्टनर्स आणि सहसंस्थापक रोहेलियो कासरेस यांनी दिली आहे. तसेच ईबी-5 प्रोग्रॅमसाठी बेन, रिलायन्स, आदित्य बिर्ला आणि मॅक किन्सी या आघाडीच्या व्यावसायिक कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. अमेरिकेमध्ये या आघाडीच्या व्यावसायिकांच्या मुलांना व्यवसायासाठी अनिश्चितेचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून यांनी या निर्णयाचं स्वागत केल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच एच वन-बी व्हिसासाठी नवे नियम बनवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच एप्रिलमध्ये ईबी-5 व्हिजा प्रोग्रॅमची मुदत संपत असून, तो कालबाह्य होणार आहे. गेल्या आठवड्यात यूएससीआईएसने ईबी-5 गुंतवणूकदारांसमोर व्हिजा प्रोग्रॅममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यात गुंतवणुकीची रक्कम 5 लाख डॉलरवरून 13.5 लाख डॉलर करण्याचे प्रस्तावित आहे. कासरेस म्हणाले, दरवर्षी भारतीयांना ईबी-5 अंतर्गत मिळणा-या ग्रीन कार्डची संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015मध्ये 8156 चिनी नागरिकांना व्हिजा जारी केला होता. तर त्याच वेळेत फक्त 111 भारतीयांना व्हिजा मिळाला आहे.
ग्रीन कार्डसाठी भारतीय खर्च करतायत 5 लाख डॉलर
By admin | Published: February 17, 2017 5:43 PM