ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - जैश- ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी भारताने चालवलेल्या प्रयत्नांमध्ये चीन सातत्यानं विघ्न आणत आहे. त्यावरून भारतानं चीनला तीव्र संताप कळवला आहे. जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्यानं भारतानं वारंवार त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र चीनचा विरोध पाहता भारतानं तीव्र संताप व्यक्त करत चीनला डेमार्श जारी केलं आहे. डेमार्श हे राजनैतिक पत्र असून, तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ते जारी केलं जातं.चीनला डेमार्श जारी केल्याची माहिती भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी दिली आहे. दिल्लीतल्या चीनचे दूतावास आणि बीजिंगच्या परराष्ट्र विभागाला हे डेमार्श देण्यात आलं आहे. मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव हा फक्त भारतानं दिला नाही, तर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनंही दिला होता, दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे, असंही भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप म्हणाले आहेत. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र अझहरवर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारतानं तीव्र संताप व्यक्त करत चीनला डेमार्श जारी केलं आहे. अमेरिकेनं फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीसमोर अझहरविरोधातील नवा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र चीनने या प्रस्तावामध्येही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यानं भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Have taken up this matter both in New Delhi with the Chinese Ambassador; I understand a similar Démarche being made in Beijing: MEA pic.twitter.com/YU1klVg6o8— ANI (@ANI_news) February 9, 2017