नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वी भारताने अणू पुरवठा गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल केला. पाकिस्तानने आपला अर्ज पाठविण्याच्या आठवडाआधी म्हणजे १२ मे रोजीच भारत सरकारने आपला अर्ज दाखल केला. येत्या ९ आणि १० जून रोजी व्हिएन्ना येथे बंदद्वार बैठकीत या अर्जांचा विचार केला जाणार आहे. भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: या ४८ सदस्यीय जागतिक संस्थेचे सदस्य असलेल्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांना वारंवार फोन करून भारताची बाजू मांडत आले आहेत.
एनएसजी सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज
By admin | Published: June 04, 2016 2:29 AM