'भारताचे शस्त्रागार अंडी देण्यासाठी नाहीय, प्रत्युत्तर द्या'; काँग्रेस खासदाराचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 14:50 IST2020-06-25T14:42:37+5:302020-06-25T14:50:26+5:30
मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

'भारताचे शस्त्रागार अंडी देण्यासाठी नाहीय, प्रत्युत्तर द्या'; काँग्रेस खासदाराचे मोदींना आव्हान
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला 45 वर्षे झाल्याने भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीही टीका केली आहे. अशावेळी काँग्रेसने पुन्हा चीनवादाकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी चीनला भारत घाबरणार नसल्याचे म्हणत चीनला त्यांना समजणाऱ्या भाषेत उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.
चौधरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही वक्तव्ये केली आहेत. चीनला जी भाषा समजते, तीच भाषा आपण बोलायला हवी. आपले शस्त्रागार अंडी देण्यासाठी नाहीत, अशी धमकी त्यांनी दिली आहे. मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे ते म्हणाले.
भारताचे जवान चिनी लष्कराला माघारी पाठविण्यासाठी सक्षम आहेत. सरकार रणनीतीतून प्रकरण सोडवित आहे. आम्हाला यावर काही समस्या नाही. मात्र, आता परिस्थिती बिघडत चालली आहे. चीन आम्हाला घाबरवत आहे, पण आम्ही घाबरणारे नाही. आम्ही अंडी देण्यासाठी एवढे मोठे शस्त्रागार बनविलेले नाहीय, अशी धमकी चौधरी यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी जेव्हा संसदेचे कामकाज सुरु होईल तेव्हा देशाला संबोधित करावे आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगावे. देश पंतप्रधानांसोबत उभा आहे. आपल्या शूर जवानांसोबत उभा आहे. चीनने लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंत घुसखोरी केली आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे, असे सांगत मोदींना आव्हान दिले आहे.
युद्धाची तयारी?
पेंगाँग सरोवर, गलवान खोरे आणि पूर्व लडाखमधील संवेदनशील भागात चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच भारताच्या तीव्र विरोधानंतरही पॉईंट-१४ जवळ चीनने पुन्हा एकदा बांधकाम केले आहे. मात्र या वृत्तानुसार सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांना लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात सैनिक, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रमाण वाढवले आहे.
अन्य महत्वाच्य़ा बातम्या...
सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'
बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद
बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले
Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम
CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!