शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:10 AM

आयसीएमआर; ७८ जिल्ह्यांत साथीचा फैलाव

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे इटलीमध्ये जशी भयानक स्थिती निर्माण झाली ती वेळ केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भारतावर ओढविली नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिक ल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. भारतातील कोरोना साथीच्या स्थितीचा या संस्थेने आढावा घेतला आहे. त्यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे की, कोरोनाबाबत भारताला इटली होण्यापासून लॉकडाऊनने वाचविले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्याआठ हजारांहून अधिक झाली आहे. त्यातील सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. देशातील फक्त ७८ जिल्ह्यांपुरता या साथीचा फैलाव मर्यादित राहिला आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याचे अतिरिक्त सचिव विकास स्वरूप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला नसता तर कोरोनाचा भारतात प्रचंड प्रमाणात संसर्ग होऊन इटलीत निर्माण झाली तशी परिस्थिती उद््भवली असती. मात्र केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.सोशल डिस्टन्सिंग आवश्यकआयसीएमआरने म्हटले आहे की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग नसेल तर एका कोरोना रुग्णामुळे महिनाभरात सुमारे ४०६ लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे साथीचा झपाट्याने प्रसार होऊन अनेक जणांनी जीव गमावला असता. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगच्या बंधनामुळे आता एका कोरोना रुग्णाकडून फक्त दोन किंवा तीन लोकांनाच संसर्ग होण्याची शक्यता उरली आहे.देश एकूण रुग्ण मृत्यू बरे झाले उपचार सुरूइटली 1,52,271 19,468 32,534 1,00,269भारत 9,166 325 1,061 7,780

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीMedicalवैद्यकीयNarendra Modiनरेंद्र मोदी